Site icon Aapli Baramati News

त्यांची मैत्री तुटलीच नाही; भरधाव वेगातील बसची दुचाकीला जोरदार धडक, तिघा मित्रांचा मृत्यू

ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

बीडमध्ये बुधवारी रात्री हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ भरधाव वेगातील बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षय सुरेश मुळे (वय २२, रा. घोडकाराजुरी ता. बीड), पारसनाथ मनोहर रोहिटे (वय २२, रा. आहेरवडगाव, ता. बीड) आणि कृष्णा भारत शेळके (वय २२, रा. दगडी शहाजानपूर, ता. बीड) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघा मित्रांची नावे आहेत. तिघेही दुचाकीवर प्रवास करत होते. या प्रवासात बसने धडक दिल्याने त्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

हे तिघेजण बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे निघाले होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बसने जबर धडक दिली. या धडकेत कृष्णा आणि पारसनाथ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने अक्षयचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version