मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आज दुपारी २ वाजता विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे दिसत असून राज्याच्या विकास दरात १२.१ टक्क्याने वाढ झाली आहे. गेली तीन वर्षे राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक अडचणी होत्या. त्यातून मार्ग काढत महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरु आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसह नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता आजचा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. एकूणच आजच्या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडेच राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्प पहा Live
https://www.youtube.com/watch?v=FHMJK4RsXdM&feature=youtu.be
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे आपली बारामती न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. आपली बारामती न्यूजच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर अर्थसंकल्प लाईव्ह पाहता येईल. त्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तसेच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.