Site icon Aapli Baramati News

राज्याचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील; अमोल मिटकरींचा दावा

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील,असा दावा केला.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय चिंतन शिबिर चालू आहे. या चिंतन शिबिराला आले असता प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी हा दावा केला. अमोल मिटकरी म्हटले, पुढच्या वेळी विठ्ठलाची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करेल. पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल आणि अजित पवार हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील. तेच पुढच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील, असे अमोल मिटकरी म्हटले.

राज्यातील जनतेच्या मनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी रोष आहे. त्यामुळे अजितदादांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभो, ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे पुढची येणारी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री करेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version