आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघात; पाच जण जागीच ठार

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप

अक्कलकोट : प्रतिनिधी

अहमदनगरहुन कर्नाटकातील गाणगापूर येथे श्री दत्ताच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने झडप घातली आहे. गाणगापूरहून देवदर्शनकरून पुन्हा मागे परतीचा प्रवास करत होते. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर  गाडीचा टायर फुटून गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना अफझलपुर शासकीय रुग्णालयात हलवले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगरचे कुटुंब श्री दत्ताचे दर्शन घेऊन परतत असताना अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर अफजलपुर तालुक्यातील बळरोगी गावात भाविकांच्या कारचा पुढचा टायर फुटला. टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडावर कार आदळली. यामध्ये गाडीची समोरची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. त्यामुळे एकाच कुटुंबातील चार व्यक्तीसह कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ४ महिलांचा समावेश आहे. एमएच १६ बीएच ५३९२ असा कारचा नंबर आहे. डॅटसन गो प्लस या कारमधून हे सर्वजण प्रवास करत होते. परंतु कारचा भीषण अपघात झाल्याने पाच व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी अफझलपुर पोलिसांनी पंचनामा केला आहे. 


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us