पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बणल्यामुळे आता पुण्यात कडक निर्बंध असणार आहेत. विशेष म्हणजे, हे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जाणार आहे.
पुण्यात नव्याने लागू होणारे निर्बंध : कशी असेल नियमावली
- 1 एप्रिलपासून सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश
- शाळा-महाविद्यालयं 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
- मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम अनिवार्य
- सार्वजनिक बस वाहतूक सुरू
- लग्न समारंभात फक्त 50 लोकांचीच उपस्थिती
- अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी
- सार्वजनिक उद्यानं, बागबगीचे फक्त सकाळच्याच वेळेत सुरू
- उपहारगृह, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु राहतील