Site icon Aapli Baramati News

ST Strike : १० वर्षांचा करार आणि सातवा वेतन आयोग देण्याचा विचार करू; पण.. : अनिल परब यांची घोषणा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करतानाच १० वर्षांचा करार करण्याबाबत विचार होवू शकतो असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत राज्यातल्या जनतेची कोंडी संपवावी, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार केला जाईल, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र संपाबद्दल अद्यापही संभ्रम आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. मात्र बेशिस्तपणाही चालणार नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

सातवा वेतन आयोग आणि करार 10 वर्षाचा करा अशीही मागणी आली. त्यावरही विचार केला जाऊ शकतो. मात्र एसटी कर्मचारी संप मागे घेणार नसतील तर सरकारलाही विचार करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version