मुंबई : प्रतिनिधी
माझ्या वडिलांनी कोणताही गुन्हा केला नसताना त्यांना दोन वर्षे जेलमध्ये ठेवले होते. तर माझ्या काकूंना १८ महिने जेलमध्ये ठेवले होते. त्यामुळे मी जेलमध्ये जाण्यास अजिबात घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिली.
काल मला जे प्रश्न पाठवले होते ते आणि चौकशीतले सगळे प्रश्न खुप वेगळे होते. ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा भंग केल्यासारखं वाटत नाही का असा सवाल त्यांनी मला विचारला. साक्षीदाराला असे सवाल विचारतात का? साक्षीदारांसारखी चौकशी न करता आरोपींसारखी पोलीसांनी माझी चौकशी केली. कोणीतरी प्रश्न जाणीवपूर्वक बदलले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून सरकारला आव्हान दिले. माझ्या घरातील दोन व्यक्तींनी जेलमध्ये दिवस काढलेत. त्यामुळे मीही जेलमध्ये जाण्यास घाबरत नाही, असेही ते म्हणाले.