आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

SHOCKING : पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघा भावंडांचा मृत्यू; आईच्या डोळ्यांदेखत घडली दुर्दैवी घटना

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी  

अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डानजीक असलेल्या आंतरवाली येथील पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, आईच्या डोळ्यांदेखत ही दुर्दैवी घटना घडली असून आईने प्रयत्न करूनही त्या मुलांना वाचवू शकली नाही. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुवारी दुपारी ही घटना घडली. यामध्ये कृष्णा परमेश्वर सुरवसे, दीपक ज्ञानेश्वर सुरवसे आणि सानिया ज्ञानेश्वर सुरवसे या तिघा भावंडांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, ही सर्व भावंडे आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी पाझर तलावाकडे गेली होती. कपडे धुवत असताना सानियाचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. तिला पाण्यात पडलेलं पाहून दीपक आणि कृष्णा हे दोघे भाऊदेखील पाण्यात उतरले.

सानियासोबत दोघं भावंडेही बुडू लागली. ही बाब आईच्या लक्षात आल्यानंतर तिनेदेखील तलावात उडी मारली. मात्र तिलाही या मुलांना वाचवणे शक्य झाले नाही. या तलावाच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर तिथे धाव घेत या मुलांसह आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या तिघा भावंडांच्या आईला वाचवण्यात यश आले. मात्र हे तिघांना वाचवण्यात यश आले नाही.

या घटनेत मृत पावलेले दीपक आणि सानिया हे दोघे सख्खे बहिण-भाऊ होते. तर कृष्णा हा त्यांचा चुलत भाऊ आहे. या तिघांच्याही दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर या तिघा भावंडांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us