आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

रूपाली चाकणकर यांनी दिला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. आज मुंबईत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.त्यामुळे त्यांनी राजीनामा का दिला यावर चर्चा सुरू आहे.

दरम्यान, रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला गेला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नविन चेहरा कोण असणार याकडे आता सगळयांचे लक्ष लागले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीचा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधीही देण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us