Site icon Aapli Baramati News

राज्यात लवकरच पोलिसांच्या ७ हजार २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया; काय आहे नेमका निर्णय..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ५ हजार २९७ पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच यांची नेमणुक केली जाईल. येत्या काही दिवसांत पोलिसांच्या ७ हजार २३१ पदांसाठी भरती  प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलातील ७ हजार २३१ पदांची भरती येत्या काळात सुरू करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जाईल.

पोलीस दल सक्षम करण्यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. सोबतच ब्रिटिश कालीन पोलिस निवासाच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन इमारतींसाठी निधीही उपलब्ध  करून दिला जाईल. राज्य राखीव पोलीस दलातील पोलिसांना राज्य पोलिस दलात सामावून घेण्यासाठीची १५ वर्षांची अट शिथिल करून १२ वर्षे करण्यात आलेली आहे. यासोबतच होमगार्ड्स ना १२० ते १५० दिवस काम देण्याचा आणि पोलिस शिपाई पदावर असणार्‍या पोलिसांना पोलिस उपनिरीक्षक पदावर कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय ही यावेळेस घेण्यात आल्याचे वळसे पाटील यांनी जाहीर केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version