आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

POLITICAL BREAKING : महाराष्ट्रातलं सरकार ‘दळभद्री’; फार काळ टिकणार नाही : धनंजय मुंडे

भाजपच्या कितीही पिढ्या आल्या तरी बारामतीत काही फरक पडत नाही

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

भाजपने राज्यात  ४५ जागांचं लक्ष्य ठेवलंय की एकट्या महाराष्ट्रातून ते तीनशे खासदार निवडून आणतात याचं उत्तर मी काय देऊ शकत नाही. प्रत्येक निवडणुकीची परिस्थिती वेगळी असते. त्यांनी काय टार्गेट ठेवावं हा त्यांचा अधिकार असून जनतेने मनात कोणाला टार्गेट करायचे हे निश्चित केले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेलं सरकार ‘दळभद्री’ असून ते जास्त दिवस टिकणार नसल्याचा दावा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

इंदापुरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने नेमकं काय टार्गेट ठेवलं आहे याबद्दल माहिती नाही. कदाचित त्यांना तीनशे खासदार महाराष्ट्रातून निवडून आणायचे असतील असा टोला लावत धनंजय मुंडे म्हणाले, महाराष्ट्रातील दळभद्री सरकारच्या लोकप्रियतेवर लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न आहे. मात्र हे स्वप्नही धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रातलं आताचं सरकार दळभद्री असून ते फार काळ टिकेल असं चित्र नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी नमूद केले. भाजपच्या मिशन बारामतीवरही धनंजय मुंडे यांनी जोरदार घणाघात केला.  भाजपच्या आताच्या पिढीने येणाऱ्या २४०० वर्ष जरी जन्म घेतला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये त्यांना काहीही फरक पाडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरीतच भाजपचं हे धोरण असतं की आपल्या बाबतीत इतर ठिकाणी ज्यावेळेस वातावरण खराब होतं, त्यावेळी जिथे भारतीय जनता पार्टीची चर्चा होईल अशा ठिकाणी जायचं. ही चर्चा होणे इतपतच त्यांचं बारामती ला येणं आहे. या अगोदरच्या अनेक निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने स्वत:चं डिपॉझीट गमावलेले आहे हे त्यांनी विसरू नये असेही धनंजय मुंडे म्हणाले.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us