Site icon Aapli Baramati News

Political Breaking : काँग्रेसवर निशाणा साधत नरेंद्र मोदींनी केले शरद पवार यांचे कौतुक

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रस्तावावर शरद  पवार यांचे कौतुक करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शरद पवार अनेक क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

राज्यसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर निशाणा साधला. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांचं तोंड भरून कौतुकही केलं.  कॉंग्रेसने कोरोना काळात राजकारण केले. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक घेण्यात आल्या होत्या. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्याला पाठ फिरवली होती असा आरोप करत कोरोना काळात शरद पवार राज्यभर दौरे करत होते. त्यांचा आदर्श कॉंग्रेसने घेण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मला शरद पवार यांचे आभार मानायचे आहेत. हा निर्णय यूपीएचा नाही, असे ते म्हणाले होते. जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधेल असे आश्वासन त्यावेळी त्यांनी मला दिले होते. केंद्राने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीस शरद पवार, तृणमूल कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या नेते उपस्थित राहिले. संपूर्ण मानवजातीवर संकट आले असताना काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला. काँग्रेसने शरद पवारांकडून काहीतरी शिकावे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version