Site icon Aapli Baramati News

PCMC : युवा नेते पार्थ पवार यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा हल्लाबोल.. म्हणाले, खिसे भरण्यात व्यस्त असलेल्यांकडून विकासाच्या नावाखाली फसवणूक..!

ह्याचा प्रसार करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली फसवणूक करुन स्वत:चे खिसे भरण्यात व्यस्त असलेल्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात पार्थ पवार यांनी केला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या जनतेला सत्ताधाऱ्यांनी ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात मात्र नागरीकांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यावरून पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला घेरले आहे. यासंदर्भात पार्थ पवार यांनी ट्विट करत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. 

पिंपरी चिंचवडमधील सामान्य नागरिक जेव्हा घरी जायला निघतात, तेव्हा त्यांचं स्वागत विविध समस्यांनी होते. वाहतुकीची कोंडी, रस्त्यांमधील खड्डे, वारंवार होणारे अपघात, गायब झालेले सिग्नल आणि अपूर्ण विकासकामे अशा विविध समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवायचे आणि नागरिकांना मूलभूत सुविधाही द्यायच्या नाहीत, हीच पद्धत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अवलंबली आहे. त्यामुळे सामान्य नागरीक या कारभारावर वैतागले असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

स्मार्ट सिटीवरुनही पार्थ पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विकासाच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरण्यात व्यस्त असलेल्यांनी सामान्य नागरिकांची चालवलेली ही फसवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असताना हीच का तुमची स्मार्ट सिटी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version