आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

आता उन्हाळ्यातही शाळा सुरू राहणार; गरजेनुसार रविवारीही भरणार वर्ग : शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्टीपासून मुकावे लागणार आहे. कारण आता उन्हाळ्यातही शाळा सुरू राहणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात पूर्णवेळ शाळा सुरू राहणार आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळत होत्या. परंतु, आता नव्या परिपत्रकानुसार यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल विद्यार्थ्यांची पूर्णवेळ शाळा असणार आहे. त्याचबरोबर रविवारीही गरज असल्यास शाळा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर संसर्ग वाढल्याने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तसतशा शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शालेय शिक्षण विभागाने उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us