Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या आणखी एका खासदारांचा राजीनामा; हेमंत गोडसे यांनी दिला राजीनामा

ह्याचा प्रसार करा

नाशिक : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच आता मराठा आंदोलकांनी लोकप्रतिनिधींना राजीनाम्यासाठी आग्रह धरला आहे. कालच शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. गोडसे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला आहे.

नाशिकमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकाजवळ मराठा समाजाच्या वतीने ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. आज या आंदोलनाला खासदार हेमंत गोडसे यांनी भेट दिली. त्यावेळी आंदोलकांनी गोडसे यांना जाब विचारत राजीनामा देण्याची मागणी केली. त्यावर गोडसे यांनी आपला राजीनामा थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर नाशिकमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास १५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. आज खासदार हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवत आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याची मागणी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version