Site icon Aapli Baramati News

किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

‘आयएनएस विक्रांत’ साठी मदतनिधी प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, सोमय्या हे मागील काही दिवसांपासून गायब असल्याचे बोलले जात असतानाच न्यायालयाने त्यांना झटका दिला आहे.

आयएनएस विक्रांत या युद्ध नौकेसाठी किरीट सोमय्या यांनी मोठा निधी गोळा केला. मात्र तो शासनाला न देता स्वत:च त्याचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

किरीट सोमय्या यांनी आपण केवळ ११ हजार रुपये जमा केल्याचा दावा केला होता. मात्र ही रक्कम जमा केल्याचे कोणतेही पुरावे सिद्ध होत नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे या किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोमय्या यांच्या वकीलांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version