पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत काही उपाययोजनांबाबत सूचना केल्या. त्यानुसार उद्यापासून पुढील सात दिवस पुण्यात बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घोषित केले.
पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शहरात बेडही उपलब्ध होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर कोरोना साखळी मोडीत काढणे आवश्यक असल्याने अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
पुण्यात काय सुरू काय बंद..?
- सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
- मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद
- धार्मिक स्थळं 7 दिवसांसाठी बंद
- PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
- आठवडे बाजारही बंद
- लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
- संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- दिवसभर जमावबंदी
- जिम सुरु राहणार
- दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
- शाळा, महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद