Site icon Aapli Baramati News

महावितरणचा भोंगळ कारभार जीवावर बेतला; दोन भावंडांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणा दोन बालकाच्या जीवावर बेतला. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात टालेवाडी येथे दोन सख्ख्या चुलत बहिण-भावाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साक्षी भरत बडे (वय १२) आणि सार्थक अशोक बडे (वय ९) असे मृत पावलेल्या बहीण भावाचे नाव आहे. 

बडे कुटुंबियांच्या घराशेजारी विद्युत वाहक खांब आहे. त्या खांबातून सातत्याने त्यांच्या घरामध्ये वीज उतरत असे. शनिवारी साक्षी आणि सार्थक दोघे त्यांच्या घराच्या छतावर खेळत होते. त्यावेळी विजेचा धक्का लागून दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. दोन्ही चिमुकल्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बडे कुटुंबीयांनी या संदर्भात अनेकवेळा महावितरणकडे तक्रार केली. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी लावला आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांकडून तक्रारीची योग्य दखल न घेतल्यामुळे मुलांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बडे कुटुंबाने केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version