Site icon Aapli Baramati News

Maharashtra Unlock : महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल; रात्री ८ वाजेपर्यंत बाजारपेठ राहणार सुरू : पुण्यासह ११ जिल्ह्यातील निर्बंध कायम..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत अध्यादेश पारीत झाले आहेत. मात्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या ११ जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी या ११ जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांना कोरोना रुग्ण कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

राज्य शासनाने आज संध्याकाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत परिपत्रक काढले. त्यामध्ये राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री ८ वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहतील. तर शनिवारी आणि रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

 उर्वरीत ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्याने निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील.

नव्या नियमावलीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

१) सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी.

२)  सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी

३) सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

४) जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

५) कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी

६) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी

७) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद

८) मुंबईतली लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंदच, नव्या नियमावलीत लोकल सोडण्यावर कुठलेही भाष्य नाही.

९) मुंबई, उपनगर आणि ठाण्याचा निर्णय आपत्कालीन विभागच घेणार


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version