आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

महिला अत्याचाराला बसणार आळा; शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचारांना आता आळा बसणार आहे. कारण शक्ती कायद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर राज्यपाल आणि राष्ट्रपती या मंजुरीसाठी पाठवले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्रपतीनी या कायद्यावर स्वाक्षरी केली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  विधानसभेत सांगितले

महिलांवरील अत्याचाराविरोधात तात्काळ कठोर शिक्षा करण्याची तरतुद असलेला हा शक्ती कायदा आहे.बलात्कार, महिलांवरील ॲसिड हल्ले आणि लैंगिक छळ या गुन्ह्यांसाठी या विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर खोट्या गुन्ह्यांनाही आता चपराक बसणार आहे. महिलांची सुरक्षितता वाढविण्याकरिता आणि बळकट करण्यासाठी हा कायदा अंमलात आणलेला आहे.

या कायद्यामागचा विशेष न्यायालयाची निर्मिती व्हावी, असा उद्देश आहे. आज या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. हा कायदा अंमलात आणनारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार देशातील पहिले सरकार ठरले आहे. विशेष न्यायालये स्थापन करण्याचा कायदा लवकरच आणला जाईल असे शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us