आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Politics : भाजपच्या पोकळ धमक्यांना कोणीही घाबरत नाही : नवाब मलिक

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

सत्तेचा कितीही दुरुपयोग करा. परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलेला असतानाच राष्ट्रवादीनेही भाजपला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या धमक्यांचा समाचार घेतला.

सत्तेचा दुरुपयोग  करून विरोधी नेत्यांना कसे लक्ष्य करायचे हे भाजपसाठी नवीन नाही.  भाजपला जे करायचे आहे ते करावे; कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवा किंवा तुरुंगात बसवा. सत्तेचा दुरुपयोगही  करा, असेही मलिक यांनी म्हटले आहे. भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही असेही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us