
मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी राजभवनात ही भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आज सकाळी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
दरम्यान, विधानसभेत एकही विधेयक चर्चेशिवाय संमत होणार नाही असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भविष्यातील कामगिरीबद्दल संकेत दिले आहेत. सरकारने सामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून आपला प्रयत्न असेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.