आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

जयंत पाटील-सदाभाऊ खोत यांच्या मैत्रीची सभागृहात चर्चा; अजितदादा म्हणाले ‘दोघे इतक्यात…’

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासह दहा विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम बुधवारी सभागृहात पार पडला. त्यावेळी सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मैत्रीची सभागृहात चर्चा रंगली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या मैत्रीवर चिमटा काढला.

अजित पवार म्हणाले, अधुन-मधुन आम्हाला काही बातम्या ऐकायला मिळतात. सदाभाऊ खोत हे जयंत पाटील यांच्यासोबत गप्पा मारताना दिसतात. ते दोघे काय गप्पा मारतात, याबद्दल मला काही माहिती नाही. मात्र ते दोघे इतक्यात काही एकत्र येतील, असे मला वाटत नाही. ही गोष्ट खरी आहे की, राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले.

सदाभाऊ यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. शेतकरी चळवळीतून पुढे आलेला नेता म्हणून त्यांना ओळखलं जाते. त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले आहे. तरीदेखील त्यांनी राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. ही छातीवर लावलेल्या बिल्ल्याची आणि शेतकऱ्याची कमाई आहे, असे सांगत अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us