Site icon Aapli Baramati News

भगवे वस्त्र धारण केलेल्या गुंडांना संत म्हणता येणार नाही : मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल

ह्याचा प्रसार करा

रायपूर : वृत्तसंस्था

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे चालू असलेल्या धर्म संसदेमध्ये महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी असलेले कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. तसेच नथुराम गोडसे यांचं कौतुक केलं आहे. या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी भगवे वस्त्र धारण केलेल्या गुंडांना संत म्हणता येणार नाही, अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे  म्हटले आहे.

भूपेंद्र बघेल म्हणाले, धर्म संसदेचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द कोणत्याही सामान्य व्यक्तीला पटण्यासारखे नाहीत. भगवे वस्त्र धारण करून अशी वक्तव्य करत असतील तर त्यांना संत म्हणता येणार नाही.  त्यांना गुंड म्हणावे लागेल. आयोजकांनी अशा व्यक्तींना कार्यक्रमांमध्ये निमंत्रित करणे टाळले पाहिजे. भाजपाकडून धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.या प्रकणात कोणत्याच दोषींना निर्दोष सोडले जाणार नाही.  दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. एखाद्या कटाप्रमाणे निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे धार्मिक वातावरण गढूळ करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे भूपेंद्र बघेल यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version