Site icon Aapli Baramati News

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खुशखबर; ‘इतक्या’ जागांसाठी राज्य सरकारचे परिपत्रक

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खुशखबर आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून गट अ, ब आणि क साठी जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिले नुसार ६ हजार ३५६ जागांची भरती करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकारने दिलेल्या पत्रकानुसार तब्बल ६ हजार ३५६ जागा भरण्याची गरज आहे. राज्य सरकारने तसे मागणीपत्र एमपीएससी आयोगाला दिले आहे. त्यानुसार कोणत्या विभागात किती जागा भरल्या जाणार आहेत याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.

राज्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नोकर भरती प्रक्रिया झालीच नाही.त्यामुळे विविध विभागातील लाखो पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया रखडली असल्याने एमपीएससीची तयारी करणारे लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. रखडलेली पदांची पदभरती लवकरात लवकर पुर्ण करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version