आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रीय

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. दोन लसी घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी आणि किंचित ताप येत असल्यानं चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

मागील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान काही आमदारांसह मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंबीय आणि त्यानंतर माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वी डॉ. दीपक सावंत यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यांना अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती पुढे येत आहे.


ह्याचा प्रसार करा
महानगरे
Back to top button
Contact Us