आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

राज्यातील जमात-ए-उलेमा हिंद संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार…

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याला आपला आशिर्वाद मिळावा : सुनिल तटकरे

नागपूर : प्रतिनिधी

अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात ए उलेमा हिंद संघटनेच्या वतीने बुधवारी विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 

अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत दादांच्या नेतृत्वाखाली जमात ए उलेमा हिंद या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक ३१ ऑगस्ट झाली होती. त्यानंतर खात्यांच्या सचिवांसोबत २१ सप्टेंबर रोजी संबधित खात्याच्या मंत्र्यासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल ७०० कोटीवरुन १००० हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला याशिवाय महामंडळाकडून कर्ज घेण्याची हमी ५० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला. 

तर वक्फ बोर्डाच्या अडचणीसंदर्भात ठरल्याप्रमाणे एक समितीही गठीत करण्यात आली व इतर विषयासंदर्भात जानेवारीमध्ये अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचेही यावेळी सांगण्यात आले . या घेतलेल्या निर्णयाबद्दल अल्पसंख्याक समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करत आहोत. आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याला आपला आशिर्वाद मिळावा आणि काम करण्याची ताकद मिळावी अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये सहभागी झाल्यावर या सरकारबद्दल गैरसमज पसरवले जात होते ते गैरसमज अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाबद्दल सरकारच्या वतीने घेतलेल्या निर्णयामुळे दूर झाले आहेत असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले.

मुस्लिम समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात असा प्रयत्न केला आहे.अजितदादांनी अल्पसंख्याक समाजाबद्दल घेतलेल्या निर्णयाबद्दल सुनिल तटकरे यांनी अजितदादा पवार यांना यावेळी धन्यवाद दिले. अजितदादांच्या नेतृत्वाखाली असे अनेक निर्णय जे ५० वर्षात घेण्यात आले नाहीत ते निर्णय घेण्यात आले आहेत. आम्ही जो निर्णय घेतला त्याबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत त्याबद्दल आपण आपल्या अल्पसंख्याक मौलानांच्या वतीने समाजामध्ये सरकारच्या कामाबद्दल जागृती करावी असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संजय खोडके यांनी प्रयत्न केल्याचे नदीम सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,जमात- ए- उलेमा हिंद संघटनेचे राज्याध्यक्ष नदीम सिद्दीकी, मुफ्ती मोहम्मद रोशनशहा कासमी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आदींसह अल्पसंख्याक समाजाचे अकरा जिल्हयाचे प्रमुख उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us