आंबेगाव : प्रतिनिधी
बैलगाडा प्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता बैलगाडा शर्यत बंदीविरोधात बैलगाडा प्रेमींवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. याबाबत गुन्हे मागे घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. परंतु बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी राज्यांत ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले होते. त्यामुळे अनेक बैलगाडा प्रेमींवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. परंतु अजूनही गुन्हा दाखल झाले आहेत. दरवेळी त्यांनी गुन्हे मागे घेण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली.
दिलीप वळसे पाटील आज आंबेगाव तालुक्यातील थापलिंग यात्रेत उपस्थित होते. त्यावेळी त्यांना गुन्हे मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावरून त्यांनी बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.