Site icon Aapli Baramati News

Crime News : चौकशीला बोलावले म्हणून पोलीस ठाण्यात धिंगाणा; पोलीसांना दिली ॲट्रोसिटी दाखल करण्याची धमकी

ह्याचा प्रसार करा

पुणे :  प्रतिनिधी

चौकशीसाठी बोलवले म्हणुन पोलीस ठाण्यात गदारोळ करत पोलिसांच्या अंगावर धावून जात ॲट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी  सिंहगड पोलिसांनी रवींद्र संताराम उन्हाळे, पुनम रवींद्र उन्हाळे आणि रामदास संताराम उन्हाळे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी जानकर या तपास करत होत्या.  त्या प्रकरणी उन्हाळे कुटुंबियांना वडगाव पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलावले होते. या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात येताच आम्हाला चौकशीला का बोलवले असे म्हणत प्रचंड गदारोळ घातला. 

त्या ठिकाणी पोलीस शिपाई माळी यांच्या अंगावर ते धावून गेले. त्यानंतर त्यांच्या हातातील अतिशय महत्त्वाची कागदपत्रे फाडून फेकून दिली. त्यानंतर स्वतःलाच यांनी मारहाण करुन घेत अर्वाच्च भाषा वापरून ॲट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिली. 

या कुटुंबीयांनी गदारोळ घालत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे या करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version