Site icon Aapli Baramati News

Crime News : सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला घातला दहा लाखांचा गंडा

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

खडकी बाजारातील एका व्यावसायिकाला २४ कॅरेट चोख सोने देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी श्रीपाल निहालचंद शाह यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अवि संजय जैन (रा. कमल कुंज, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा फसवणुकीचा प्रकार २८ डिसेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान घडला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथे शाह यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांनी जैन याच्या एस. पी. गोल्ड नावाच्या ॲपवरून २१ डिसेंबर रोजी १०० ग्रॅम चोख सोने मागवले.

दुसऱ्या दिवशीही त्यांनी त्याचं ॲपवरुन १०० ग्रॅम चोख सोने मागवले. त्यानुसार शहा यांनी ३१ डिसेंबर रोजी जैन याच्या खात्यवर एकूण ९ लाख ८६ हजार ३९६ रुपये त्याच्या जमा केले. परंतु जैन याने शाह यांना ऑर्डर केलेले २०० ग्राम सोने दिले नाही.

केवळ सोन्याच्या खरेदीसाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यामुळे शाह यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक कदम करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version