Site icon Aapli Baramati News

Crime News : एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकूहल्ला; हल्लेखोराने मुलासमोरच केली आत्महत्या

ह्याचा प्रसार करा

नागपूर : प्रतिनिधी

नागपूरमधील भिवापूर परिसरात व्हॅलेंटाईन दिनीच धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला करून नंतर स्वतःच्या मुलासमोरच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.चरण (वय ५५), असे मृताचे; तर स्वर्णिमा (वय ३७, दोघांचीही नावे बदललेली) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भिवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण हा स्वर्णिमावर प्रेम करत होता. रविवारी दुपारच्या सुमारास चरण हा स्वर्णिमाच्या घरी आरी आणण्याच्या बहाण्याने गेला. स्वर्णिमा आरी आणण्यासाठी घरामध्ये गेली असता, चरण तिच्या पाठीमागे घरात घुसला. तू माझ्याशी बोलत नाहीस. तुला जिवंत मारल्याशिवाय सोडणार नाही असे म्हणत चरणने तिच्यावर चाकू हल्ला केला.

स्वर्णिमाने आरडाओरड केल्यानंतर चरण तिथून लगेच पळून गेला. जखमी स्वर्णिमा उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांसह त्याच्या मुलाने चरणचा शोध घेण्यास सुरुवात केली. काल सकाळी चरण एका शेतात लपून बसला असल्याची माहिती मिळाली.

चरणचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र शेतात गेले. यावेळी चरणच्या हातात विषाची बाटली होती. यावेळी चरणने ‘मी चुकीचे कृत्य केले. माझी बदनामी झाली, माझी मुलगी मला माफ करणार नाही’ असे म्हणत चरणने विष प्राशन केले. मुलाने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वीच चरणचा मृत्यू झाला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version