Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : पतीला दारुचं व्यसन; नशेत तो पत्नी, आई-वडिलांसह कुटुंबीयांना करत होता मारहाण; पत्नीनं दिराच्या मदतीने काढला काटा..!

ह्याचा प्रसार करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी  

दारुचं व्यसन आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नीने दिराच्या मदतीने आपल्या पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे घडली आहे. या प्रकरणी अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पत्नी आणि तिच्या भावाला अटक केली आहे.

बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे.

असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताची पत्नी अनीता बाबासाहेब उर्फ गणेश गोसावी, भाऊ मनोज किशोर गोसावी आणि सौरभ मनोज गोसावी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे दोरीने गळा आवळून खून केलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यामध्ये घटनास्थळ, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित मृतदेश बाबासाहेब उर्फ गणेश गोसावी याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी संबंधित कुटुंबियांकडे विचारपूस केली. त्यामध्ये मयताची पत्नी अनीता आणि भाऊ मनोज यांच्या जबाबात विसंगती आढळून आल्या.

पोलिसांनी या दोघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर बाबासाहेब उर्फ गणेश याचा खून केल्याची कबुली या दोघांनी दिली. बाबासाहेब याला दारुचं व्यसन होतं. त्यातून तो स्वत:च्या आईवडिलांसह कुटुंबीयांना सतत मारहाण करायचा. दि. २४ सप्टेंबर रोजी बाबासाहेब हा दारू पिऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्रास द्यायला लागला. त्यामुळे पत्नी अनीता आणि मनोजने दवाखान्यात जायचं असल्याचं सांगत स्विफ्ट कारमध्ये बसवलं. वाटेत त्याचा दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.

त्यानंतर अहमदनगर-दौंड रस्त्यावरील रेल्वे रुळाजवळ त्याचा मृतदेह टाकून दिला. त्याचवेळी त्याची ओळख पटू नये यासाठी त्यांच्या तोंडावर सिटकव्हर व पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे आणि स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version