आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्र

Crime Breaking : दोन चिमुरड्यांसह आईची आत्महत्या; विहिरीत उडी टाकून संपवले जीवन

महानगरे
ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील विटा शहरामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. आईने चार वर्षाची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकून जीवन संपवले आहे.काल (सोमवार)  दुपारी दिडच्या सुमारास ही घटना घडली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण शहरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली बिरुदेव हात्तेकर असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. शहरातील शाहूनगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत हे कुटुंब वास्तव्यास होते.  काल सकाळी सोनाली दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर दुपारपर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबियाकडून शोधाशोध सुरू झाली.  दीड वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेचा आणि दोन चिमुरड्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

यावेळी पोलिसांना सोनाली व तिचे दोन चिमुकले पाण्यात तरंगताना आढळून आले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या आणि क्रेनच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले.  सोनालीने मुलांसमवेत आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी विटा पोलीस अधिक तपास करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us