आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्र

Crime Breaking : ‘आईला माझ्या सोबत घेऊन जात आहे..’ असे सांगत वृद्ध आईचा जीव घेत स्वत:ही केली आत्महत्या

महानगरे
ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी

सांगलीतील आष्टा शहरामध्ये दत्त वासाहतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रौढ व्यक्तीने स्वत: च्या आईची गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रतन रामचंद्र कांबळे (वय ८०) असे त्या वृद्ध आईचे नाव आहे. शशिकांत कांबळे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. शशिकांतच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आई, पत्नी व मुलांसह शहरात वास्तव्यास आहे. काल पत्नी व मुले गावी गेल्याने त्याची आई व तो एकटाच घरी होता. शशिकांत दम्याच्या आजाराने त्रस्त होता. या आजाराच्या नैराश्यातून त्याने आईची कॉटवर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या खोलीत गळफास लावत स्वताला संपवले.

शशिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये मी माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे मी तिला माझ्या सोबत घेऊन जात आहे, असे लिहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.  याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us