Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : सतरा वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी पुढे आली आहे. सतरा वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत देसरडला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. भारत देसरडला हे रोहन बिल्डरचे भागीदारी संचालक आहेत. पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. 

भारत देसरडा यांनी सतरा वर्षांपूर्वी आपल्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून ते वारंवार लैंगिक अत्याचार करत राहिले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद नोंदवली असून भारत देसरडला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भारत देसरडला यांच्या विरोधातील या तक्रारीमुळे शहरात विशेषत: बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version