Site icon Aapli Baramati News

Corona Update : शाळा-महाविद्यालये बंद, दहावी बारावी परीक्षा यंदाही ऑनलाईन ?

ह्याचा प्रसार करा

मुंबई  : प्रतिनिधी

कोरोनाचा उद्रेक पाहता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील शाळा सरकारने बंद केल्या आहेत. तसेच आज महाविद्यालये बंद ठेवण्याचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षीही ऑनलाईन होणार का? असा प्रश्न विदयार्थ्यांना पडला आहे.

राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे जानेवारीअखेर लसीकरण पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत  एखाद्या विद्यार्थ्यास कोरोना संसंर्ग झाल्यास किंवा घरातील व्यक्तीस संसर्ग झाल्यास त्या विद्यार्थ्याच्या परीक्षेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. दहावीच्या दहावीच्या परीक्षा १५ मार्च  तर बारावीच्या परीक्षा ४ मार्च  या कालावधीत घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे, परंतु गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही परीक्षांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

एकीकडे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतानाच राज्यभरातील महाविद्यालयेही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version