Site icon Aapli Baramati News

CORONA BREAKING : महाराष्ट्राची धाकधूक वाढली; राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळला, जिल्हा स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांत कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात नवीन रुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या JN.1 या व्हेरियंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा शिरकाव वाढला आहे. केरळमध्ये या नव्या कोरोना व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची धाकधूक वाढली आहे. नव्या व्हेरिएंटच्या शिरकावानंतर खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण अधिक गतीमान करण्याच्या आणि कोरोना चाचण्या वाढवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये काल २९२ रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठक घेऊन राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version