Site icon Aapli Baramati News

Corona Breaking : राज्यात लॉकडाऊन नाही; निर्बंध मात्र कडक होणार : राजेश टोपे यांची माहिती

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र परिस्थिती पाहून निर्बंध कडक केले जाणार असून ऑक्सिजनची मागणी वाढल्यास लॉकडाऊनबाबत निर्णय होवू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील रुग्णसंख्या अचानकपणे वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलली असून राज्यात निर्बंधही लागू केले आहेत. सर्वांनी शासनाच्या नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करून राजेश टोपे म्हणाले, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासह संसर्ग रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात सर्वत्रच चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाला निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत बैठक घेतली असून त्यांनीही प्रशासनाला कोरोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सध्या तरी राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही.  मात्र निर्बंध कडक करण्यासंदर्भात काही निर्णय घेतले असून त्यावर कामकाजही सुरू करण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version