Site icon Aapli Baramati News

नागपूरप्रमाणे अन्य ठिकाणीही मेट्रोच्या कामासाठी सहकार्य करा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधानांकडे मागणी

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

आपल्या आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सहकार्याने नागपूर मेट्रोचे काम पूर्ण झाले.तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मेट्रोची  कामे वेगाने सुरू करण्यासाठी होण्यास आपण सहकार्य करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. विकासाच्या  कामात कोणतेही राजकारण न आणता सगळ्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी मोदींनी पहिले तिकीट काढून मेट्रोतून प्रवास केला. त्यानंतर या एमआयटी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत करत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

पिंपरी- चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असे मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण होण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना त्या नदीची सुरक्षितता, पर्यावरणाचे रक्षण जैवविविध्य, याचा  विचार करावा लागणार आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version