Site icon Aapli Baramati News

राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर : अजितदादांनी घेतला निर्णय

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सीएनजी इंधनावरील व्हॅट कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार केवळ ३ टक्के कर आकारणी करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सीएनजी इंधनाचे दर १ एप्रिलपासून कमी होणार आहेत.

या निर्णयामुळे टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच राज्यात सीएनजी इंधन स्वस्त झाल्याने प्रदुषण नियंत्रणासही मदत होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version