पुणे : प्रतिनिधी
राज्यात दररोज लैंगिक अत्याचार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज्य शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दर पाच वर्षांनी चारित्र्याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पडताळणी अहवालात कर्मचाऱ्यांचे चारित्र्य चांगले नसल्यास त्या कर्मचाऱ्याला समज दिली आहे जाणार आहे. त्याचबरोबर शाळेतील प्रांगणात, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह आणि व्यायामशाळा यांसारख्या सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. विद्यार्थ्यांचे हात पोहोचतील अशा ठिकाणी सिक्युरिटी कॅमेरा बसवावेत अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.
व्हॉट्सॲप नंबर आणि हेल्पलाईन नंबरसाठी विद्यार्थ्यांना विभागीय कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार करता येणार आहे. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रारदेखील त्यांना चिराग या ॲपच्या मदतीने करता येणार आहे. तक्रार दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक मदत शाळांनी करावी, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.