Site icon Aapli Baramati News

Breaking News : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांच्याबद्दल अपशब्दही वापरण्यात आले आहेत. या प्रकरणी भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

शुक्रवारी किशोरी पेडणेकर यांना कुरिअरमधून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. पत्रात अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे पत्र पनवेलहून कुरिअर करण्यात आले आहे. त्यावर वेगळ्या ठिकाणचा पत्ता लिहिलेला आहे. पोलिसांनी महापौरांचे जबाब नोंदवले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांना धमकी मिळाल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी भायखळा येथील महापौर बंगल्यावर गर्दी केली. किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी बुधवारी रात्री भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून धमकावले आहे. याबाबत भायखळा पोलिस अधिक तपास करीत आहेत.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version