आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BREAKING NEWS : ठाकरे गटाला धक्का; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेनेतील बंडानंतर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी दाखल केली होती.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या संपूर्ण सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर अद्याप सुनावणी सुरू असून त्यामध्ये १६ आमदारांची अपात्रता, सत्ता स्थापनेतील दुजाभाव अशा बाबींचा समावेश आहे. या दरम्यान, निवडणूक आयोगासमोरही सत्तासंघर्षाचे प्रकरण सुरू आहे. पक्ष कोणाचा हे ठरेपर्यंत आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्ष आणि चिन्हावर ठाकरे व शिंदे गटाने दावा केला होता. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  आज मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us