Site icon Aapli Baramati News

Breaking News : राज्यात ६ जून “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सोमवार दि. ६ जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन केले जाणार आहे.

६ जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला  आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version