Site icon Aapli Baramati News

Breaking News : प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा आज पुन्हा अपघात; महिन्याभरात तिसऱ्यांदा झाला अपघात

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीचा आज पुन्हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात प्रवीण दरेकर यांना कुठलीही इजा पोहोचलेली नाही. विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर हा अपघात झाला. या महिन्यातील प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एकाच गाडीचा सलग तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. 

याबाबत प्रवीण दरेकर यांनी बोलताना म्हटले की, पक्षाच्या आणि जनतेच्या कामासाठी मी राज्यभरात फिरतो. एकाच महिन्यात माझ्या गाडीचा तिसर्‍यांदा अपघात झाला आहे. प्रत्येक वेळी दुचाकीस्वार समोर आल्याने अपघात घडला आहे. आज मुंबईतही दुचाकीस्वार समोर आल्यानेच अपघात झाला. त्यामुळे या प्रकरणांमध्ये मला माझा घातपात करण्याचा संशय आहे. यासंदर्भात लवकरच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

दरम्यान, एकाच महिन्यात तीन वेळा प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला. प्रवीण दरेकर यांना अपघातात कोणतीही इजा झालेली नाही. त्यामुळे भाजप नेत्यांकडून प्रवीण दरेकर यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच कारणासाठी प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version