पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत आहे.अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर आरटी- पीसीआर चाचणी केली असता माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर आहे. आपल्या सदिछांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल,असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पहिला लाटेत त्यांना कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र लक्षणे सौम्य असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावरही घरच्या घरी उपचार सुरू आहेत.