Site icon Aapli Baramati News

Breaking News : करुणा शर्मांचा जेलमधील मुक्काम वाढला; जामिनावर शनिवारी सुनावणी

ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या करुणा शर्मा यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. तपास अधिकारी आणि फिर्यादी गैरहजर राहिल्याने आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या जामिनावर शनिवारी सुनावणी होणार आहे.

परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल होता. त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणीसाठी आज मंगळवारची तारिख देण्यात आली होती. मात्र फिर्यादी आणि तपासी अधिकारीच गैरहजर राहिल्याने ही सुनावणी शनिवार (दि. १८ ) रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत शर्मा उर्फ करुणा मुंडे परळीत आल्या होत्या. मात्र या ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली त्‍यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version