Site icon Aapli Baramati News

Breaking News : अखेर भाजपाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यास नकार

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी निलंबित असलेले भाजपच्या १२ विधानसभा सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विधानसभेच्या सभापतींनी निलंबित केल्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने भाजप आमदारांना जोरदार झटका देत निलंबन मागे घेण्यास नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नाही. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांनी विधानसभेच्या सभापतींकडे निलंबन मागे घेण्याची विनंती करावी, अशी  सूचना देत सर्वोच्च न्यायालयाने निलंबन मागे घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित १२ आमदारांना सहभागी होता येणार नाही. एक वर्षासाठी भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशनात काय झाले होते ?

पावसाळी अधिवेशना दरम्यान तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासमोरील माईक ओढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर काही काळासाठी सभागृह स्थगित केल्यानंतर भाजप आमदारांनी सभापतींच्या दालनात जाऊन भास्कर जाधव यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या घटनेमुळे भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

कोण आहेत भाजपचे निलंबित आमदार..?


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version