Site icon Aapli Baramati News

Breaking News : शाळा सुरू करण्यासंदर्भात १५ डिसेंबरला होणार अंतिम निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत काही शाळा बंद तर काही शाळा सुरू आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्वच शाळांबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी शाळांबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेण्याचे संकेत दिले. यापूर्वी राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र शाळा सुरू करण्याबाबत एकमत नसल्यामुळे काही शाळा सुरू, तर काही शाळा अद्याप बंद आहेत. त्यामुळे आता राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांबाबत बुधवार दि. १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शाळांबाबत घेतला जाणारा निर्णय हा संपूर्ण राज्यासाठी लागू असेल, असेही त्यांनी सांगितले.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version