Site icon Aapli Baramati News

Breaking News : महाविकास आघाडीच्या नेत्यांची शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम हे या बैठकीत सहभागी झाले आहेत. राज्यामध्ये कृषि कायदा लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषि कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला होता. तसेच कॉँग्रेस पक्षानेही राज्यात शेतकऱ्यांना पूरक कायदा अस्तित्वात आणण्याबाबत मागणी लावून धरली होती.  केंद्राच्या कायद्यात नसलेल्या बाबींचा समावेश करून राज्यात कृषि कायदा करावा अशी कॉँग्रेसची भूमिका होती.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी  महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. कृषि कायद्यायसंदर्भातील उपसमितीचे सदस्य असलेले नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. राज्याचा कृषि कायदा कसा असावा याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतरच हा कायदा राज्यात लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version